Monday, February 9, 2026

Minor Abortion Case: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यासाठी नर्सिंग ऑफिसरने उकळले १६ हजार रुपये

Minor Abortion Case: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यासाठी नर्सिंग ऑफिसरने उकळले १६ हजार रुपये

मुंबई: सरकारी हॉस्पिटलमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सगळ्या नियमांना तोडून एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका नर्सिंग ऑफिसरने अधिकृत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हा अवैध प्रकार केला. त्यासाठी १६ हजार रुपयांची लाच घेतल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील छतरपूरमधला हा खळबळजनक प्रकार आहे.

या प्रकरणाचा खुलासा तांत्रिक देखरेख आणि सखोल तपासणीनंतर झाला आहे. नर्सिंग ऑफिसर प्रीती दुबे यांनी हा गर्भपात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नियमानुसार गर्भपात केवळ अधिकृत डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होऊ शकतो. पण येथे एमटीपी (MTP) कायद्याच्या सर्व तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले. नर्सिंग ऑफिसर प्रीती दुबे यांनी सुरुवातीला हा गुन्हा नाकारला होता. पण, डॉक्टर एस. प्रजापती आणि डॉक्टर सुरेखा खरे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत सत्य बाहेर आलं आहे.

आरोग्य विभागाने नेमलेल्या तपास समितीने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता आणि बनावट संदर्भांचा वापर करून हा गर्भपात उरकला गेला. भोपाळ स्तरावरून झालेल्या पुनरावलोकनानंतर आता संबंधित नर्सिंग ऑफिसरवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.

तपास पथकासमोर साक्षीदारांनी स्पष्ट केले की, नर्सनेच 'सफाई' करण्याच्या नावाखाली पैसे घेतले होते. इतकेच नाही तर दुसऱ्या डॉक्टरांच्या नावाची बनावट स्लिपही तयार करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या भविष्याशी खेळणाऱ्या या नर्सिंग ऑफिसरला आता दोषी ठरवण्यात आले आहे. भोपाळच्या आरोग्य संचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लवकरच अटकेची किंवा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा