Monday, February 9, 2026

सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचा करिष्मा; मोहिते पाटील, जानकरांना जोरदार धक्का

सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचा करिष्मा; मोहिते पाटील, जानकरांना जोरदार धक्का

मुंबई : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. विशेषतः माळशिरस तालुक्यात अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव झाला असून, विशेषतः शरद पवार गटाचे वर्चस्व मोडीत निघाले आहे.

माळशिरस तालुक्यातील दहिगाव–गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला. याच तालुक्यात आमदार उत्तम जानकर यांच्या मुलालाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी जानकर यांच्या मुलावर मात करत विजय मिळवला. अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी चपळगाव गटातून विजयी झाले असून, त्यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी याही चपळगाव गणातून विजयी झाल्या आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नज गटातून भाजपच्या चैत्राली मुळे विजयी झाल्या आहेत. करमाळा तालुक्यात भाजपच्या रश्मी बागल यांनी विजय मिळवला, तर करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख हे १ हजार ११६ मतांनी विजयी झाले. माढा तालुक्यात मानेगावातून भाजपचे पृथ्वीराज सावंत विजयी झाले आहेत.

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून भाजपचे अनिल वैद्य विजयी झाले असून, उपळाई ठोंगे गणातून भाजपच्या मीनाक्षी रोंगे यांनी यश संपादन केले आहे. बोरामणी गटातून भाजपचे नेताजी खंडागळे हे ८४४ मतांनी विजयी झाले, तर बोरामणी गणातून भाजपच्या वर्षा पटणे यांनी २ हजार १३९ मतांनी विजय मिळवला. कासेगाव गणातून भाजपचे विजय राठोड हे २ हजार २८८ मतांनी विजयी झाले आहेत.

दहिगाव गटातून संस्कृती सातपुते विजयी झाल्या असून, गुरसाळे गणातून दत्तात्रय विठोबा शेळके, तर दहिगाव गणातून भाजपचे नुजा बाळू खिलारे विजयी झाले आहेत. आष्टी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराज डोंगरे यांनी विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment