मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यात कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार याचा निर्णय आज होईल. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला झाली आहे. १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी शनिवारी मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीआधीच महायुतीच्या २५ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
कोकणात महायुतीच्या तब्बल २७ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ८, तर पंचायत समितीच्या १७ जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. ५० सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. तर 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाल्याचं समोर आलं आहे. रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महायुतीच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी-
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (८ बिनविरोध )
१) खारेपाटण; प्राची इस्वालकर(भाजप) २)बांदा; प्रमोद कामत (भाजप) ३)जाणवली; रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना) ४)पडेल ;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप) ५)बापर्डे ;अवनी अमोल तेली (भाजप) ६) पोंगुर्ले; अनुराधा महेश नारकर (भाजप) ७)किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप) ८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)
पंचायत समिती कणकवली(६ बिनविरोध)
१)वरवडे ; सोनू सावंत (भाजपा) २)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप) ३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप) ४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप) ५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप) ६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप)
देवगड तालुक्यातील पंचायत समिती(६ बिनविरोध)
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप) २)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप) ३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप) ४) फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप) ५) शिरगाव – शितल सुरेश तावडे (भाजप) ६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)
पंचायत समिती वैभववाडी(१ बिनविरोध)
१) कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप) पंचायत समिती वेंगुर्ले (१ बिनविरोध) १)आसोली; संकेत धुरी (भाजप)
मालवण पंचायत समिती (१ बिनविरोध)
१)अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर (भाजप)
सावंतवाडी पंचायत समिती (१ बिनविरोध)
१)शेरले; महेश धुरी (भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती (१ बिनविरोध)
१)कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)







