मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत


मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.


सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली नाहीत. ती राखीव स्वरूपातील होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही. तरीसुद्धा ही मतदान यंत्र वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.


मोहोळ तालुक्यातील २२० मतदान केंद्रांवर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर काही राखीव मतदान यंत्र तात्काळ सुरक्षा कक्षात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला. कुरूल (५५) गटातील काही मतदान केंद्रांसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील ०२ कंट्रोल युनिट व ०२ बॅलेट युनिट यासंदर्भात हा प्रकार घडला.


दरम्यान, ही मतदान यंत्रे एका वाहनातून खासगी ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला व ही मतदान यंत्रे राखीव स्वरूपातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सदर मतदान यंत्रे शासनाच्या सुरक्षा कक्षात सीलबंद करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना