नवी दिल्ली: शत्रुराष्ट्रांच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषद (डिफेन्स अक्विझिशन कौन्सिल – डीएसी) लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करणारे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) लष्करासाठी शंभरपेक्षा जास्त राफेल लढाऊ विमाने, पी-८ आय मरिटाइम पॅट्रोल आणि अंटी सबमरिन वारफेअर एअरक्राफ्ट तसेच मरिन गॅस टर्बाईन इंजिनसह विविध साहित्य खरेदी करण्याची तयारीत आहे.
अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी अनेक तरतुदी:
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी ७ लाख ८४ हजार ६७८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील २ लाख १९ हजार ३०६ लाख कोटी रुपये शस्त्रसाठा लढाऊ विमाने, अत्याधुनिक शस्त्रे, जहाज, पाणबुड्या, ड्रोन आदींवर खर्च केला जाणार आहे.
The Indian Air Force is set to gain unilateral freedom to integrate weapons of its choice — including indigenous munitions — on 114 new Rafale fighter jets under a landmark defence deal with France. फ्रांस के साथ रक्षा समझौते के तहत भारतीय वायु सेना को 114 नए राफेल विमानों पर… pic.twitter.com/xJrXoE2xzm
— Indian Defence Times (@IndianDefenceT) February 8, 2026
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर:
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १९ आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारतात येत आहेत. मॅक्रॉन भारतात येण्यापूर्वी राफेल विमाने खरेदी प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता घेतली जाऊ शकते. याशिवाय, अमेरिकेकडून फायटर जेट विमाने खरेदी करण्याच्या रखडलेल्या प्रस्तावावरही पुनर्विचार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. यासाठी - डीएसीची महत्त्वाची बैठक पुढील ३ आठवड्यात दिल्लीत होणार आहे.







