Sunday, February 8, 2026

'कीवीं'चा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, टिम सायफर्ट आणि ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी

'कीवीं'चा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, टिम सायफर्ट आणि ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी

चेन्नई  : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचे १८३ धावांचे आव्हान १७.५ षटकांतच पूर्ण करत ५ गड्यांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या गुलबदिन नैबने झुंजार अर्धशतक झळकावूनही न्यूझीलंडच्या आक्रमक फलंदाजीपुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषकातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळवला गेला. अफगाणिस्तानने गोलंदाजी-फलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली, पण संघ विजय मात्र मिळवू शकला नाही. न्यूझीलंडने यासह टी-२० विश्वचषक २०२४ मधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला फक्त ७५ धावांवर सर्वबाद केले होते. पण आता किवी संघाने २०२६च्या विश्वचषकात विजय मिळवत बदला घेतला.

अफगाणिस्तानने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेफर्ट व फिलिप्सने शानदार खेळी केली. मुजीबने दुसऱ्या षटकात फिन एलन व रचिन रवींद्र यांना क्लीन बोल्ड केलं. पण फिलिप्स सेफर्टच्या ७४ धावांच्या भागीदारीने संघाला सामन्यात कायम ठेवले. टिम सायफर्टने ४२ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावा तर ग्लेन फिलिप्सने २५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ४२ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी महत्त्वाची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. तर मार्क चॅपमनने २८ धावांचे योगदान दिले. तर अखेरीस सँटरन व डॅरिल मिचेल यांनी संघाला विजय मिळवून दिला.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रहमानुल्ला गुरबाज २७ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. गुरबाज झाद्रान फर्ग्युसनच्या एका षटकात झेलबाद झाले. यानंतर गुलबदिन नायबने वादळी खेळी केली. गुलबदिनने ३५ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. तर सदिकउल्ला अटलने २९ धावांचं योगदान दिलं. तर दारविश रसूलीने १३ चेंडूत २० धावा केल्या. तर ओमरझाईने १४ धावा आणि नबीने १० धावांचे योगदान दिले. यासह अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ६ बाद १८२ धावा करण्यात यशस्वी ठरला. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या चेपॉकच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर मॅट हेन्री, जेकब डफी, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. सामन्याची थोडक्यात गुणतालिका: अफगाणिस्तान: १८२/६ (२० षटके) - गुलबदिन नैब ६३, फर्ग्युसन २/४०. न्यूझीलंड: १८३/५ (१७.५ षटके) - टिम सायफर्ट ६५, मुजीब उर रहमान २/३१.

Comments
Add Comment