T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. स्टार खेळाडू हर्षित राणा अनफिट असल्याची माहिती समोर आली आहे. ऑलराऊंडर हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्याने तो या स्पर्धेतून बाद झाला आहे.



मोहम्मद सिराजला संधी:


हर्षित राणाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली होती, ज्यानंतर मेडिकल टीमने त्याला अनफिट घोषित केले. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्कॅन रिपोर्टनुसार राणा या टूर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी आता मोहम्मद सिराज भारतीय पेस अटॅकची धुरा सांभाळताना दिसेल. यामुळे बॉलिंग लाईनअपमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.



कर्णधारपदी सूर्यकुमार यादव:


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. भारतीय संघात अभिषेक शर्मा, टिळक वर्मा आणि रिंकू सिंह यांसारख्या आक्रमक फलंदाजांना स्थान मिळाले आहे, तर यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्यावर असेल. हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून कणा असेल, तर गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव सांभाळतील.


भारत आणि अमेरिका (T20 World Cup 2026) यांच्यातील ही महत्त्वाची लढत शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.



ऑस्ट्रेलियाला दुखापतीचा फटका:


अंतिम संघ जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स आणि मॅथ्यू शॉर्ट हे दुखापतीमुळे या विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला आपली रणनीती बदलावी लागणार आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी