नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच सुदैवाने जीवितहानी टळली आहे. आज मालेगावमधील महापालिकेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानकचं खाली कोसळल्याने धक्कादायक घटना घडली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षग जास्त माणसांचा भार झाल्याने आणि लिफ्टची चैन तुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून ...
१८ जणांसह लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली
तब्बल १८ नागरिक असलेली एक लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक खाली कोसळली. मात्र, नशिबाची साथ आणि एका तांत्रिक अडथळ्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोसळणारी लिफ्ट थेट जमिनीवर न आदळता पहिल्या मजल्याजवळ अडकली. लिफ्टचा दरवाजा पहिल्या मजल्यावरच अडकल्याने मोठा फटका बसला नाही आणि लिफ्टमधील सर्व १८ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. या घटनेनंतर लिफ्टच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भिंत तोडून १८ जणांना बाहेर काढलं अन्...
लिफ्ट कोसळल्याच्या थरारक घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्टमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला चक्क भिंत तोडावी लागली. या विशेष प्रयत्नांनंतर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. विशेष म्हणजे, या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक आणि पाच पत्रकारही अडकले होते. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ भीतीचे वातावरण आणि गोंधळ निर्माण झाला होता, मात्र सर्वजण सुखरूप बाहेर आल्याने अखेर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.






