Saturday, February 7, 2026

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर होणार असे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून वारंवार सांगितले जात होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे दिसू लागले आहे. मुंबई महापालिकेसाठी महायुतीने महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या अर्थात भाजपच्या रितू तावडे या महायुतीच्यावतीने महापौरपदाच्या उमेदवार आहेत. तसेच शिवसेनेचे दहिसर पूर्वचे नगरसेवक संजय घाडी हे महायुतीच्यावतीने उपमहापौरपदाचे उमेदवार आहेत. उपमहापौरपदाचा उमेदवार सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी असेल. घाडींचा उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर महायुतीच्यावतीने उपमहापौरपदासाठी नव्या उमेदवाराची योग्य वेळी घोषणा केली जाणार आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांच्या तसेच मुंबई मनपातील महायुतीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले.

महत्त्वाचे
  1. शनिवारी महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार
  2. शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
  3. मुंबईच्या महापौर पदासाठी महिला सर्वसाधारण गटाचे आरक्षण

मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६

  1. भाजप ८९
  2. शिवसेना २९
  3. राष्ट्रवादी काँग्रेस ३
  4. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार १
  5. उबाठा ६५
  6. मनसे ६
  7. काँग्रेस २४
  8. समाजवादी पार्टी २
  9. एमआयएम ८
  10. इतर १३
  11. एकूण २२७
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >