Saturday, February 7, 2026

Kolhapur Accident : ब्रेकिंग! कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भरधाव क्रेटाने दुचाकीला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

Kolhapur Accident : ब्रेकिंग! कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भरधाव क्रेटाने दुचाकीला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident) आज एक हृदयद्रावक अपघात घडला. एका भरधाव क्रेटा कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार हवेत उडून लांब फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, क्रेटा कार अत्यंत वेगात होती. या कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर कारवरचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या मधोमध पलटी झाली. दुसरीकडे, धडक बसलेल्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन कोसळल्याने त्यांना डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.

बचावकार्य आणि पोलीस कारवाई

अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआर (CPR) रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी गर्दी केलेल्या बघ्यांना बाजूला केले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उलटलेली क्रेटा कार रस्त्यावरून हटवून वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >