अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रंगलेला खेळ निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. निवडणुका झाल्या पण आता महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी महापालिकेत रंगलेले नाट्य पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातही असेच काहीसे घडले आहे. अमरावती महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक झाली. महापौर होण्यासाठी उमेदवाराला बहुमताची आवश्यकता होती.


अमरावती महापालिकेत एकूण ८७ जागा आहेत. भाजप १५, युवा स्वाभिमान पार्टी ( रवी राणा यांचा पक्ष) १५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) ११, शिवसेना ३ असं एकूण ५४ नगरसेवकांचा संख्याबळ भाजपकडे आहे. अशा परिस्तिथीत श्रीचंद तेजवानी यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र एमआयएमच्या नगरसेविकेने त्यांना मतदान केल्याने भाजपचे संख्याबळ अधिकच वाढले आहे.





एमआयएममध्ये खळबळ


एमआयएमच्या नागरसेविकेने भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे पक्षांतर्गत शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपने एमआयएमची एक नगरसेविका फोडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सभागृहात लीलाबाई कांबळे यांनी श्रीचंद तेजवानी यांना पाठिंबा देत हात उंचावला त्यावेळी सर्व अचंबित झाले . एमआयएमचे इतर नगरसेवक त्यांना हात खाली करण्यासाठी सांगत होते. पण लीलाबाई कांबळे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या.

Comments
Add Comment

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस

अमरावती होणार उद्योगांचे नवे केंद्र! ५९० रुपयांत मिळणार जमीन

मुंबई : अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत

पुणे - पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी

पुणे : इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल