तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळाबाबत गंभीर आरोप करत, त्या काळात वापरण्यात आलेल्या तुपाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


कुरनूल जिल्ह्यातील येमिगनूर येथे झालेल्या एका जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री नायडू यांनी आरोप केला की, जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपतीचे लाडू बनवण्यासाठी वापरलेले तूप रसायनांपासून तयार करण्यात आले होते. या तुपाच्या निर्मितीत वापरलेले काही घटक हे बाथरूमच्या साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांशी संबंधित आहे .त्यामुळे धार्मिक भावना आणि आरोग्याच्या दृष्टीने हा मुद्दा संवेदनशील ठरला आहे.


मुख्यमंत्री नायडू यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या कार्यपद्धतीवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, सध्याच्या व्यवस्थापनाखाली प्रसादाच्या दर्जात सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी आणि आताच्या लाडूंमध्ये स्पष्ट फरक जाणवतो. यावेळी त्यांनी टीटीडीचे माजी अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्या काही जुन्या वक्तव्यांचा संदर्भ देत, भेसळीच्या आरोपांकडे लक्ष वेधले.


दरम्यान, तिरुपती लाडू प्रकरणात यापूर्वीही तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये या प्रकरणाशी संबंधित काही डेअरी व्यावसायिकांना अटक करण्यात आली होती. लाडूसाठी वापरलेल्या तुपात भेसळ असल्याच्या संशयावरून विशेष तपास पथक (SIT) आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरू करण्यात आली होती.


याआधी सप्टेंबर महिन्यातही मुख्यमंत्री नायडू यांनी लाडू प्रसादात वापरण्यात आलेल्या घटकांवर प्रश्न उपस्थित केले होते. ताज्या वक्तव्यांमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय व धार्मिक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या आरोपांवर वायएसआर काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Gold and silver ETF Prices: सोने-चांदीच्या ETF किमतीत ९ टक्क्यांनी वाढ

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार (US-India Trade Deal) झाला आहे. स्वतः