मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मालाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अजित रावराणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचाही शिवसेनेला पाठिंबा असून यासाठी सहयोगी गट बनवून अधिकृत पाठिंब्याची प्रक्रिया सुरु आहे . त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्येही ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
मुंबई महापालिकेत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ अशाप्रकारे ११८ असे निम्म्यापेक्षा अधिक संख्या होत आहे. तर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ०३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या ३ नगरसेवकांचा पाठिंबा सहयोगी गटाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्यावतीने सुरु आहे. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे . मात्र, याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही . त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होवून हा पाठिंबा मिळाला जाईल असे बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मालाडमधील एकमेव नगरसेवक असलेल्या अजित रावराणे यांनीही शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आता नगरसेवक अजित रावराणे राहणार आहेत. याबाबत नगरसेवक अजित रावराणे यांनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे . पण त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मी शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून एकमेव नगरसेवक असल्यामुळे मी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. . विभागात विकास कामे करण्यासाठी विकास निधीची गरज असते आणि याचे आश्वासन शिवसेनेने दिल्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिल्याचे रावराणे यांनी सांगितले.






