Friday, February 6, 2026

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर भलत्याच चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक अभिनेत्यांसोबत तीच नाव जोडलं जात आहे. अशातच मृणालचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बेबी बंपसह दिसत आहे. तिच्यासोबत वरूण धवन हा अभिनेता अगदी आपुलकीने तिची काळजी घेताना दिसत आहे. परंतु हा व्हिडिओ समोर येताच 'मृणाल प्रेग्नेंट आहे का ?' असा प्रश्न निर्माण होतोय. यामुळे प्रेक्षकांमध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. काही युजर्सनी तर धवनसोबतच्या तिच्या चर्चांशी हा विषय जोडला आहे.

खरंच मृणाल ठाकूर प्रेग्नंट आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओचं मृणाल ठाकूरच्या पर्सनल लाईफशी काहीही घेणंदेणं नाही आहे. खरतर तिच्या आगामी सिनेमाच्या शुटिंग सेटवरचे हे फोटो आणि व्हिडीओ आहेत. मृणाल ठाकूर आणि अभिनेता वरुण धवन एका आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमाच्या शुटिंग सेटवर दोघेही एकत्र दिसून आले. त्यावेळीच दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला. सिनेमातल्या एका शॉर्टसाठी मृणाल ठाकूरनं बेबी बंपचा लूक केला. त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा गैरसमज अनेकांना झाला. पण, खरंतर हा त्यांच्या सिनेमाच्या शुटिंगचा भाग होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >