Friday, February 6, 2026

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे. लोकलमध्ये गर्दी इतकी असते अनेकवेळा प्रवाशांची भांडणं आणि गर्दीमुळे रागाच्या भरात प्रवाशांकडून गुन्हे देखील घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच मालाडमध्ये झालेल्या भांडणात एकाने दुसऱ्याला भोसकले होते.

नेमकं घडलं काय ?

त्यानंतर असाच एक धक्कदायक प्रकार बांद्रे स्थानकावर घडला आहे. दोन प्रवाशांच्या वादात एका अज्ञात इसमाने फेकलेला दगड एका तरुणाला लागला असून प्रवाशाचा डोळा कायमचा निकामी झाला आहे.

निशांत कुमार खत्री ( २८ ) असं दुखापतग्रस्त तरुण दादरचा रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत अकाऊंट्स विभागात काम करतो. बुधवारी रात्री १०.४० च्या सुमारास निशांत अंधेरी- चर्चगेट फास्ट लोकलने घरी परतत होते. डब्यात दोन प्रवाशांमध्ये जोरात भांडण सुरु झाले. ११ च्या सुमारास हि ट्रेन वांद्रे स्थानकावर पोहोचली तेव्हा भांडण करणाऱ्यांपैकी एक जण खाली उतरला आणि त्याने दगड उचलून भांडत दुसऱ्या व्यक्तीवर फेकला. परंतु हा दगड त्या व्यक्तीला न लागता निशांत खत्रीचाय डाव्या डोळ्याला अत्यंत वेगाने लागला. यामुळे निशांतचा डोळा रक्तबंबाळ झाला.

वेळीच मदती न मिळाल्याने नुकसान

निशांतने दिलेल्या माहितीनुसार, लोक नुसते बघतच राहिले कोणीही मदत करायला पुढे आले नाही. त्याला स्वतःच चालत स्टेशन मास्तराच्या ऑफिस पर्यंत जावे लागले. तिथेही त्यांच्या दाखल कोणी घेतली माही ताटकळत ४५ मिनिटे त्याला बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला भाभा रुग्णालयात आणि नंतर हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. उपचाराला इतका उशीर झाला कि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी ही कायमची गेली. निशांत हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आणि लवकरच त्याचा साखरपुडा होणार होता. पण या घटनेने त्याचे आयुष्य हे कायमचे उध्वस्त झाले आहे.

पोलीस कारवाई

वांद्रे रेल्वे पोलिसांनी ( GRP ) या प्रकरणी अज्ञात प्रवाशांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलाम ११८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment