'ग्रामीण विकासासाठी शिवसेनेला पाठबळ द्या'

विकासकामे, घरकुल आणि पाणीप्रश्न सोडवण्याची दिली हमी


खेडमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांसह योजनांचाही वाचला पाढा


राजगुरुनगर  : ग्रामीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणे गरजेचे असून शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची खेड-राजगुरुनगर येथे जाहीर प्रचारसभा पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.


कार्यकर्तेच खासदार-आमदार घडवतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने शिवसेना उमेदवारांना पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी करत ७ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी मतदारांनी सावधपणे निर्णय घ्यावा, असे सांगितले.
लोकसभा-विधानसभा निवडणुकांप्रमाणे ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती महत्त्वाच्या असून राज्यात थांबलेला विकास पुढे नेण्याचे काम सरकारने केले असल्याचे ते म्हणाले.


अडीच वर्षांत राज्यभर फिरून लोकाभिमुख निर्णय घेतल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, नावासमोर आईचे नाव लावण्याचा निर्णय यांचा उल्लेख केला. महिलांना स्वतः सही करून पैसे काढण्याचा अधिकार दिल्याने त्यांचा सन्मान वाढला असून अनेक महिलांनी छोटा-मोठा व्यवसाय सुरू करून अर्थव्यवस्थेला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण फीच्या भीतीने विद्यार्थिनीने आत्महत्या केलेल्या घटनेनंतर सरकारने ५० ऐवजी १०० टक्के फी माफीचा निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला.


शेतकरी हा केंद्रबिंदू असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेत वार्षिक सहा हजार रुपये, पिकविमा व नुकसानभरपाई निकष सुलभ, अतिवृष्टी मदत एनडीआरएफच्या दुप्पट, दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत, सततच्या पावसामुळे होणारे नुकसान भरपाईत समाविष्ट करण्यात आले. ३२ हजार कोटींचे पॅकेज देण्यात आले असून शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.


सरकारने “शासन आपल्या दारी”नंतर “आरोग्य आपल्या दारी” उपक्रम सुरू केला असून महात्मा जोतिबा फुले आरोग्य विमा मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली, १६२ ग्रामपंचायती पेपरलेस केल्या व १३ सेवा ऑनलाइन उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. घरकुल योजनांमध्ये खेड तालुका आघाडीवर असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हजारो घरे मंजूर केली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


स्थानिक विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १५६ कोटींचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, राजगुरुनगर-भीमाशंकर रस्ता, बुडीत बंधारे, सिंचन प्रकल्प, ३० गावांतील ९०८८ हेक्टर जमिनींचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. नगरपरिषदांना निधी कमी पडू देणार नाही, समिती इमारतीसाठी १४ कोटी मंजूर केले असून स्मारकासाठी २५४ कोटींचा आराखडा तयार केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.


लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नसून ती निवडणुकीपुरती घोषणा नसल्याचा पुनरुच्चार करत खोटी आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारावर शिवसेना काम करत असल्याचे सांगून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत त्यांनी सभेचा समारोप केला. यावेळी आमदार शरद सोनावणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख विकास रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nashik News : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दिलासा

Nashik News : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना

Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

MPSC Paper Leak News : प्रेयसीसाठी पठ्ठ्याने फोडला 'एमपीएससी'चा पेपर

- पोलिसांच्या अहवालानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द; एका प्रेमकहाणीमुळे हजारो उमेदवारांच्या करिअरला फटका मुंबई :