राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


श्री. लाड हे डॉ. शिरोडकर हायस्कूल व महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून, युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये त्यांनी १९८६ ते १९८९ या कालावधीत सलग चार वेळा मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्यांनी बी.कॉम., एम.ए. व एल.एल.एम. अशी उच्चशिक्षणाची पदवी संपादन केली आहे. कोकण व मुंबईतील विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.


दुकाने व आस्थापना विभागात कार्यरत असताना त्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराविरोधात प्रभावी जनजागृती केली. यासाठी त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच व्यापारी संघटनांच्या सहकार्याने नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

Team India Schedule : विश्वचषकाच्या विजयानंतर पुढील कामगिरीसाठी भारतीय संघ सज्ज

- जाणून घ्या भारतीय संघाचे नवीन व्यस्त वेळापत्रक २०२६ चा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने जागतिक

ICC Men's T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकामुळे आयसीसीची कोट्यवधींची कमाई

मुंबई : ICC Men's T20 World Cup २०२६ स्पर्धा केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही मोठी ठरली आहे. या स्पर्धेतून

मॅच फिक्सिंग प्रकरणात ICC ची मोठी कारवाई; वेस्ट इंडिजचा खेळाडू आणि दोन संघ अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मॅच फिक्सिंग आणि गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी कठोर कारवाई करत वेस्ट इंडिजचा

Kaviya Maran : पाकिस्तानी खेळाडूच्या खरेदीनंतर सनरायझर्स अडचणीत; X अकाउंट झाले सस्पेंड

मुंबई : काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं इंग्लंड येथे होणाऱ्या द हंड्रेड २०२६ च्या

सनरायजर्स लीड्सच्या काव्या मारनने पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेतल्याने समाज माध्यमावर संताप

मुंबई: काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट

Rahul Dravid : बीसीसीआयकडून राहुल द्रविडचा सर्वोच्च सन्मान; शुभमन गिलचाही होणार विशेष सन्मान

- मुंबईचा आयुष म्हात्रे सर्वोत्तम ऑलराउंडर लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि