Gold and silver ETF Prices: सोने-चांदीच्या ETF किमतीत ९ टक्क्यांनी वाढ

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार (US-India Trade Deal) झाला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती दिली. या करारामुळे भारतीय बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. अमेरिकेने टॅरिफ कमी केल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. तर दुसरीकडे मात्र सोने आणि चांदीचे भावही वाढले आहेत.


बुधवार ४ फेब्रुवारी रोजी सोने-चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. याचा परिणाम आता गोल्ड आणि सिल्व्हर ETF वरही दिसून आला आहे. गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात ETF खरेदी करत आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.



तेजीचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या ईटीएफवर:


कमोडिटी मार्केटमधील या तेजीचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या ईटीएफवर दिसून येत आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये सिल्व्हर ETF मध्ये ९% वाढ झाली आहे, तर गोल्ड ETF मध्येही ७ टक्क्यांची वाढ झाली आहे.



सिल्व्हर ईटीएफ (ETF) ९ टक्क्यांपर्यंत वाढले:


चांदीच्या किंमतीत वाढ होण्याबरोबरच सिल्व्हर ETF वर खरेदीदार सक्रिय झाले आहेत. टाटा सिल्व्हर ETF आणि एडलवाईस सिल्व्हर ETF मध्ये जवळपास ९ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर कोटक सिल्व्हर ETF मध्येही ८ टक्क्यांनी वाढ झाली. त्याच वेळी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एसबीआय, आदित्य बिर्ला सन लाइफ आणि यूटीआयच्या सिल्व्हर ETF सारख्या इतर प्रमुख ETF मध्येही ७ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे.



गोल्ड ETF मध्ये ७ टक्के वाढ: 


त्याच वेळी, द वेल्थ कंपनी गोल्ड ETF ने गोल्ड ETF मध्ये ७ टक्क्यांची वाढ केली आहे, तर क्वांटम आणि एडलवाईज गोल्ड ETF मध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय मोतीलाल ओसवाल, डीएसपी, अ‍ॅक्सिस आणि टाटा गोल्ड ETF सारख्या प्रसिद्ध फंडांनीही ४ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.

Comments
Add Comment