सरकारी सुट्टी पण बँकिंग सेवा सुरू राहणार, सरकारी व्यवहारांसाठी RBIचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ चा शेवटचा दिवस असलेल्या ३१ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी सरकारी व्यवहारांवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या दिवशी सरकारशी संबंधित बँकिंग सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश RBI कडून देण्यात आले आहेत.


रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, केंद्र आणि राज्य सरकारांच्या वतीने व्यवहार करणाऱ्या बँकांच्या (राष्ट्रीयकृत बँका अर्थात नॅशनलाइज्ड बँका) शाखा ३१ मार्च रोजी सामान्य नागरिकांसाठी खुल्या राहणार आहेत. या निर्णयामुळे वित्तीय वर्ष संपताना होणारे सरकारी आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करता येणार आहेत.


RBI ने स्पष्ट केले आहे की, भारत सरकारच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण वित्तीय वर्षाच्या अखेरच्या दिवशी कर संकलन, शासकीय देयके, अनुदान वितरण, विभागीय हस्तांतरणे तसेच इतर आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. अशा वेळी बँक सेवा बंद राहिल्यास लेखाजोखा आणि सेटलमेंट प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.


या निर्णयानुसार, कर भरणे, चालान जमा करणे, सरकारी खात्यांशी संबंधित पेमेंट्स तसेच इतर शासकीय बँकिंग सेवा ३१ मार्च रोजी उपलब्ध राहतील. त्यामुळे करदाते, व्यापारी, उद्योग आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व संबंधित बँकांना ग्राहकांना याबाबत पूर्वसूचना देण्याचेही आदेश दिले आहेत, जेणेकरून शेवटच्या दिवशी सरकारी व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही. या सुविधांचा योग्य प्रचार करण्यावरही RBI ने भर दिला आहे.


दरवर्षी ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असल्याने सरकारी खात्यांमधील अंतिम नोंदी, समायोजन आणि लेखापरीक्षणपूर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यामुळे या दिवशी बँकिंग सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय सरकार आणि वित्तीय व्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. हे परिपत्रक RBI चे मुख्य महाप्रबंधक यांच्या कडून जारी करण्यात आले असून, ते देशभरातील सर्व एजन्सी बँकांना लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वित्तीय वर्षाच्या अखेरीस सरकारी व्यवहार अधिक सुलभ आणि सुरळीत पार पडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

China AI Robot Wolf Army : भविष्यात AI कुत्रे करणार ड्रोनचा सामना; भविष्यातील युद्धासाठी चीनची ‘रोबोट वुल्फ आर्मी’ सज्ज!

चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे

Iran-US-Israel War : युद्ध संपलेले नाही,गरज पडल्यास युद्धात परतण्यास इस्त्रायल सज्ज - बेंजामिन नेतन्याहू

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Shivendrasinhraje Bhonsle : मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा

मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया