मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती दिली आहे. मोदी यांनी सोमवारी (२ फेब्रुवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणानंतर ही घोषणा केली. विशेष म्हणजे या करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ मध्ये मोठी कपात झाली आहे. त्यामुळे टॅरिफ आता २५% वरून १८% झाला आहे.
अनेक महिन्यापासून भारत आणि अमेरिकेत व्यापारी तणाव वाढला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारासमोर भारतानं मोठं आव्हान उभं केलं. अखेर अमेरिका आणि भारतात गेल्या काही दिवसांपासून लांबलेला व्यापारी करार सोमवारी रात्री निश्चित झाला. या कराराची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून केली.
या कराराचे (US-India Trade Deal) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी या कराराचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
मैत्रीचा एक नवीन अध्याय! भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या… https://t.co/cOSEDXoVWp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2026
मैत्रीचा एक नवीन अध्याय!
भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल. महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे कौतुक केले आहे.






