Tuesday, February 3, 2026

Dhurandhar 2 Teaser : रक्ताने माखलेला अवतार आणि डोळ्यांत अंगार! रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' चा नवा पोस्टर रिलीज; सोशल मीडियावर वादळ

Dhurandhar 2 Teaser : रक्ताने माखलेला अवतार आणि डोळ्यांत अंगार! रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' चा नवा पोस्टर रिलीज; सोशल मीडियावर वादळ
मुंबई : भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या 'धुरंधर' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच निर्मात्यांनी आज 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) चा एक अत्यंत थरारक आणि रक्ताने माखलेला नवीन पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये रणवीर सिंह पावसात उभा असून, लाल प्रकाशामुळे तो रक्ताच्या वर्षावात भिजल्याचा भास होत आहे. रणवीरने हा पोस्टर शेअर करताना "आता बिघडण्याची वेळ आली आहे" अशी कॅप्शन दिली असून, यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
View this post on Instagram
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

आज दुपारी १२:१२ वाजता चित्रपटाचा अधिकृत टीझर लाँच केला जाणार आहे. 'धुरंधर'चा पहिला भाग जागतिक स्तरावर १,३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून ऐतिहासिक ठरला होता. भारतात ८०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हिंदी चित्रपट ठरला आहे. त्यामुळेच पार्ट-२ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे, अक्षय खन्ना यांची 'रेहमान डकैत' ही व्यक्तिरेखा फ्लॅशबॅकच्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर दिसणार आहे, तसेच 'बडे साब' कोण आहे, याचा उलगडाही या भागात होण्याची शक्यता आहे.

'धुरंदर २' कधी होणार रिलीज ?

हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट लढत दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटाशी होणार असल्याने चित्रपटसृष्टीत मोठी चुरस पाहायला मिळेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >