नागपूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका २६ वर्षीय निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे नागपूरच्या वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टर हा नेत्ररोग विभागात कार्यरत होता आणि त्याने नुकताच पदव्युत्तर (PG) अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र एका तरुण आणि होतकरू डॉक्टरच्या अशा जाण्याने त्याच्या सहकारी डॉक्टरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.
पुणे: पुणे महापालिकेच्या महापौरपदाबाबतची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच मंगळवार ...
रुजू होऊन आठवडाही झाला नाही अन्न...
बुलढाणा येथील रहिवासी असलेले २६ वर्षीय तरुण निवासी डॉक्टर ऋत्विक सागर ठाकूर यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने नागपूर मेडिकलसह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ऋत्विक यांनी मुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम. रुग्णालयातून आपले वैद्यकीय शिक्षण (MBBS) पूर्ण केले होते. त्यांचे दोन्ही पालकही डॉक्टर असून, ऋत्विक यांनी नुकताच २७ जानेवारी २०२६ रोजी नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये कार्यरत असलेले ऋत्विक सोमवारी हॉस्पिटलमध्ये गैरहजर होते. त्यामुळे डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी वारंवार फोन करूनही ऋत्विकने प्रतिसाद न दिल्याने संशय बळावला. अखेर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये ऋत्विक थांबले होते, तिथल्या व्यवस्थापनाला माहिती दिली. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या हाकेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा ऋत्विक यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे अवघ्या काही दिवसांपूर्वीच प्रवेश घेतलेल्या या तरुण डॉक्टरने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
तरुण डॉक्टरच्या आत्महत्येने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका तरुण निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पदव्युत्तर शिक्षणाचे (PG) स्वप्न उराशी बाळगून नुकताच प्रवेश घेतलेल्या या २६ वर्षीय डॉक्टरच्या अकाली निधनाने वैद्यकीय क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हा डॉक्टर नेत्ररोग विभागात कार्यरत होता. सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये त्याने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस येताच सहकारी डॉक्टरांमध्ये आणि मेडिकल परिसरात शोककळा पसरली आहे. अभ्यासू आणि तरुण सहकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस सध्या विविध अंगांनी तपास करत असून लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
डॉक्टर पालकांचा एकुलता एक आधार हरपला
बुलढाणा येथील मूळ रहिवासी आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC) निवासी डॉक्टर ऋत्विक सागर ठाकूर (२६) यांनी सोमवारी सकाळी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, ऋत्विक यांनी केवळ ७ दिवसांपूर्वीच, म्हणजेच २७ जानेवारी २०२६ रोजी नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. ऋत्विक यांचे दोन्ही पालक व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांनी स्वतः मुंबईतील नामांकित के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस (MBBS) पूर्ण केले होते. उच्च शिक्षणासाठी ते नागपुरात डॉ. दिलीप उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. सध्या कॉलेजच्या वसतिगृहात जागा मिळेपर्यंत ते गणेशपेठ बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. सोमवारी ऋत्विक कर्तव्यावर हजर न झाल्याने विभागप्रमुख डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी केलेल्या वारंवार फोनला ऋत्विकने प्रतिसाद न दिल्याने संशय बळावला. अखेर हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने आणि पोलिसांच्या उपस्थितीत रूमचा दरवाजा तोडला असता, ऋत्विक यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, गणेशपेठ पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.






