Tuesday, February 3, 2026

लातूरमध्ये कौटुंबिक वादातून आयकर अधिकाऱ्याचा मृत्यू; मुलानेच...

लातूरमध्ये कौटुंबिक वादातून आयकर अधिकाऱ्याचा मृत्यू; मुलानेच...

लातूर : लातूर जिल्ह्यातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली असून, आयकर विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा घरातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, या प्रकरणात त्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत अधिकाऱ्याचे नाव कृष्णकुमार सन्मुखराव (वय अंदाजे ५५) असे असून, ते मूळचे अहमदपूर तालुक्यातील रहिवासी होते. सध्या ते लातूर शहरालगत खोपेगाव परिसरात कुटुंबासह राहत होते. त्यांनी अलीकडेच या भागात स्वतःचे घर उभारले होते.

ही घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. घरात असताना कृष्णकुमार सन्मुखराव आणि त्यांचा मुलगा शंतनू यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात मुलाने वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कृष्णकुमार सन्मुखराव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.वडील आणि मुलामधील वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील चौकशीत या घटनेमागील नेमके कारण समोर लवकरच समोर येईल

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >