आतापी-वातापीची कथा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे


पूराणात देवदेवतांच्या तसेच राक्षसांच्या विविध कथा आहेत. राक्षसांच्या क्रौयाच्या विविध कथा आहेत. राक्षस देव, ऋषीमुनी व मानवांना विविध प्रकारे त्रास देत असत. अशाच प्रकारे त्रास देणाऱ्या दोन राक्षस बंधूंची कथा महाभारतातील वनपर्वातील तीर्थपर्वात आहे. महाभारतातील कथेनुसार एका नगरात आतापी (याचाच काही ठिकाणी ईलवल म्हणूनही उल्लेख केला आहे) व वातापी नावाचे दोन क्रूर व मायावी राक्षस बंधू राहत होते. वातापीला कोणतेही लहान-मोठे रूप धारण करण्याची कला होती. त्या दोन्ही बंधूंनी वाटसरूंना तसेच अनेक तीर्थयात्रींना लुबाडून असंख्य धन जमा केले होते. लोकांना ठार मारण्याची त्यांची एक अभिनव पद्धत होती. आतापी लोकांना अथवा वाटसरूंना, ऋषीमुनींना अथवा तीर्थयात्रींना मोठ्या आदराने भोजनाला बोलावीत असे. वातापी एखाद्या प्राण्याचे अथवा कोणत्याही खाद्यपदार्थाचे रूप घेत असे. आतापी त्या प्राणी रूपी अथवा खाद्यरूपी वातापीला ठार करून अथवा कापून त्याचे स्वादिष्ट भोजन बनवून अतिथीला पोटभर जेवू घालत असे. एवढेच नव्हे, तर वर अतिथीला दक्षिणाही देत असे. अतिथी बाहेर गेल्यानंतर आतापी वातापीला ‘वातापी ये’ म्हणून हाक देत असे व वातापी त्या व्यक्तीचे पोट फाडून आपल्या मूळ रूपात परत येत असे. अशा प्रकारे ते वाटसरू, तीर्थयात्री व ऋषीमुनींची हत्या करीत असत, तसेच त्यांच्याजवळ असलेले धनही लुटत व त्यांचे मांसही भक्षण करीत असत. अशा प्रकारे त्यांनी अगणित संपत्ती गोळा केली होती.



एके दिवशी महर्षी अगस्ती ऋषी वाटेने जात असता या दोघांनी त्यांना नाटकी आदराने बोलावून भोजनास आमंत्रित केले. अगस्ती ऋषी सर्वज्ञ असल्याने त्यांनी राक्षस बंधूंच्या मनातील हेतू ओळखला व त्यांनीही राक्षस बंधूंना अद्दल घडविण्याचे ठरवले; परंतु वरकरणी तसे भासू न देता ते भोजनाला गेले. नेहमी प्रमाणे वातापीने आपले रूप बदलले. आतापीने त्यापासून स्वादिष्ट भोजन बनविले व अगस्ती ऋषींना वाढले. अगस्त्य ऋषींनीही पोटभर जेवण केले. हात धुऊन त्यांनी ‘वातापीचे पचन हो’असे म्हणून पोटावरून हात फिरविला. त्याबरोबर वातापी अगस्तींच्या पोटातच मरून गेला; परंतु याची कल्पना नसलेल्या आतापीने ‘वातापी ये’ म्हणून हाक दिली. मात्र अगस्ती ऋषींनी त्याला वातापी आता माझ्या पोटातच जीरला आहे तो परत येणार नाही. असे सांगताच आतापी घाबरून गेला. आपला कट असफल झाल्याचे व अगस्ती ऋषींनी वातापीला पोटातच नष्ट केल्याचे पाहून आतापी पळू लागला; परंतु महर्षी अगस्तीने त्यालाही मंत्राद्वारे ठार केले. अशा प्रकारे महर्षी अगस्तींनी जनतेला आतापी व वातापीच्या जाचातून मुक्त केले.


तात्पर्य : समाजामध्ये सतप्रवृत्तीप्रमाणेच दुष्ट प्रवृत्तीचे लोकही असतात. जे गोड बोलून इतरांचा घात करतात, तेव्हा अशा लोकांपासून
सावध असावे.

Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,