Budget 2026 : अर्थसंकल्पात शिक्षणासाठी मोठ्या तरतुदी; मुलांसाठी वसतिगृहे, कंटेन्ट क्रिएटिव्ह लॅब....

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत दीर्घकालीन विकासाचा आराखडा मांडण्यात आला आहे. ग्रामीण ते शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, शिक्षणाला चालना मिळावी आणि कौशल्याधारित शिक्षण मजबूत व्हावे, हा या तरतुदींचा मुख्य उद्देश आहे.



शिक्षणाबत केल्या गेल्या 'या' तरतुदी


खगोलशास्त्राला चालना देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.


डिजिटल शिक्षण अधिक मजबूत करून हस्तलिखितांना देखील प्रोत्साहन दिले जाईल.


हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत ट्रेकिंगची व्यवस्था करणार आहेत.


पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधणीसाठी योजना देखील सुरु केली जाईल, तसेच प्रयोगशाळांना अधिक सुसह्य केले जाईल


भारताला वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, देशात ५ प्रादेशिक केंद्रे स्थापन करण्यास राज्यांन मदत करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात मांडला आहे.



कंटेन्ट क्रिएटिव्ह लॅब


निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, अनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्रातील भरभराट लक्षात घेता, १५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये AVGC 'कंटेंट क्रिएटर लॅब्स' स्थापन करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजला मदत देण्याचा प्रस्ताव आहे. अर्थसंकल्पात मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला १५,००० माध्यमिक शाळांमध्ये 'कंटेंट लॅब्स' स्थापन करण्यासाठी मदत देण्याचा प्रस्ताव आहे. क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी खेलो इंडिया मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

TMC MPs notice : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या