Sunday, February 1, 2026

Pune Police Bharti : पुणेकरांसाठी मोठी बातमी! अखेर पोलीस भरतीचे बिगुल वाजले; 'या' तारखेपासून चाचणीला सुरुवात

Pune Police Bharti : पुणेकरांसाठी मोठी बातमी! अखेर पोलीस भरतीचे बिगुल वाजले; 'या' तारखेपासून चाचणीला सुरुवात

पुणे : पुणे शहराच्या सीमांचा विस्तार आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता, पुणे पोलीस दलावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आता प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली पोलीस भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागणार असून, रिक्त पदे भरण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. पुणे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी गृह विभागाने हिरवा कंदील दिला आहे. या भरती प्रक्रियेसाठीची संभाव्य तारीख प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली असून, लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयामुळे वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळाला असून, पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला यामुळे अधिक बळकटी मिळणार आहे.

निम्म्या मनुष्यबळावर शहराची सुरक्षा

पुणे शहराची सुरक्षा सध्या केवळ निम्म्या पोलीस बळावर अवलंबून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहराची वाढती व्याप्ती आणि लोकसंख्या पाहता पुणे पोलीस दलात किमान २१ हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या ५० टक्के मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कार्यरत पोलिसांना २४-२४ तास सलग कर्तव्य बजवावे लागत असून, त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आणि कौटुंबिक आरोग्यावर होत आहे. गेल्या वर्षी शहरात सुरक्षेसाठी पाच नवीन पोलीस ठाणी सुरू करण्यात आली, मात्र आवश्यक पदभरती न झाल्याने ही चणचण अधिकच तीव्र झाली आहे. नव्या ठाण्यांमुळे कामाची व्याप्ती वाढली असली तरी कर्मचारी मात्र तेवढेच आहेत. यामुळे पुणे पोलिसांवरील ताण असह्य झाला असून, रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आता जोर धरत आहे.

फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीचे संकेत

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भातील नियोजनाचे संकेत दिले असून, पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी अंदाजे १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. या शारीरिक चाचणीसाठी पुणे शहरासह राज्यभरातून हजारो तरुण-तरुणी पुण्यात दाखल होण्याची चिन्हे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था, मैदानांची सज्जता आणि पारदर्शक चाचणी प्रक्रियेसाठी पुणे पोलीस प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. मैदानी चाचणीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड करून पोलीस दलातील मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.

ही भरती का महत्वाची ?

या भरतीमुळे प्रामुख्याने तीन स्तरावर मोठे बदल अपेक्षित आहेत. प्रथम, कामाचा ताण कमी होईल; नवीन कर्मचारी आल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांना हक्काच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि कामाचे निश्चित तास मिळणे शक्य होईल. दुसरे म्हणजे, गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल; शहरात नव्याने सुरू झालेल्या पोलीस ठाण्यांना पुरेसे संख्याबळ मिळाल्यास गस्त आणि गुन्ह्यांच्या तपासाला वेग येईल. तिसरे आणि महत्त्वाचे म्हणजे, खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना रोजगाराची सुवर्णसं

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >