मैदानात उतरण्यापूर्वीच 'पाक'ने टेकले गुडघे, भारताविरुद्धच्या महामुकाबल्यातून माघार

नवी दिल्ली  : आगामी टी-२० विश्वचषकाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. पाकिस्तान सरकारने या स्पर्धेतील आपल्या संघाच्या सहभागाला हिरवा झेंडा दाखवला असला, तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध खेळण्यास मात्र स्पष्ट नकार दिला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार नाही, अशी अधिकृत घोषणा रविवारी संध्याकाळी करण्यात आली.


पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नकवी यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने बांगला देशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिल्यामुळे पीसीबीने नाराजी व्यक्त केली होती. बांगलादेशवर अन्याय झाल्याची भूमिका घेत नकवी यांनी जागतिक क्रिकेट नियामक मंडळावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून स्पष्ट केले की, ‘‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय क्रिकेट संघाला आयसीसी विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे; मात्र १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या नियोजित सामन्यात पाकिस्तानचा संघ खेळणार नाही’’. यापूर्वी मोहसीन नकवी यांनी या संदर्भातील अंतिम निर्णय ३० जानेवारी किंवा २ फेब्रुवारी रोजी घेतला जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच सरकारने आपला पवित्रा जाहीर करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना तांत्रिकदृष्ट्या सोडून दिला आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तानचा समावेश 'गट अ' मध्ये आहे. या गटात भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच ७ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने करेल.

Comments
Add Comment

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स