एलेना रायबाकिनाने ऑस्ट्रेलियन ओपनवर कोरले नाव

सबालेन्काचा धुव्वा उडवत पटकावले विजेतेपद


मेलबर्न : एलेना रायबाकिनाने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या चित्तथरारक अंतिम सामन्यात रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अरिना सबालेन्काचा ६-४, ४-६, ६-४ असा पराभव करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले.


२०२३ च्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये सबालेन्काने रायबाकिनाला हरवले होते. तब्बल तीन वर्षांनंतर त्याच मैदानात रायबाकिनाने सबालेन्काला पराभूत करून त्या पराभवाचा गोड वचपा काढला आहे. रायबाकिनाचे हे एकूण दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. २ तास १८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये रायबाकिना ०-३ अशा पिछाडीवर होती. सबालेन्का सहज जिंकेल असे वाटत असतानाच रायबाकिनाने विलोभनीय खेळ केला. तिने शेवटच्या ६ गेम्सपैकी ५ गेम्स जिंकत साबालेंकाचे विजयाचे स्वप्न उधळून लावले.


सबालेन्काची सलग दुसरी हार
दुसरीकडे, सबालेन्कासाठी हा पराभव धक्कादायक ठरला. २०२५ मध्ये मॅडिसन कीजकडून पराभूत झाल्यानंतर, सबालेन्काची ही सलग दुसऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यामध्ये हारली आहे.




  • विजयाची वैशिष्ट्ये :

  • क्रमवारीतील झेप : या विजयानंतर एलेना रायबाकिना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचणार आहे.

  • नंबर १ विरुद्ध वर्चस्व: जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या खेळाडूंविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम (६०% यश) आता रायबाकिनाच्या नावावर झाला आहे.

  • सर्व्हिसचा जोर : सामन्याच्या शेवटच्या पॉइंटवर 'एस' मारून रायबाकिनाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Comments
Add Comment

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि

INDvsSL : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीवर भारताची मजबूत पकड

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर

Durand Cup 2026 Final : २२ वर्षांची प्रतीक्षा संपवत ईस्ट बंगाल ठरला चॅम्पियन; मोहन बागानचा ४-१ असा धुव्वा!

कोलकत्ता : भारतीय फुटबॉल वर्तुळातून एक अतिशय रोमांचक आणि मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबो येथील सिंहलीज क्रिकेट

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीमध्ये पावसाचा व्यत्यय, भारताने उभारला धावांचा डोंगर; ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर

https://prahaar.in/2026/08/24/if-i-get-a-chance-i-will-contest-elections-olympic-medalist-saina-nehwal-said/ श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात मुसळधार

Saina Nehwal : 'मौका मिला तो चुनाव लड़ूंगी', ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालची मोठी घोषणा!

ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवालने निवडणूक

Ind vs SL 2nd Test Rishabh Pant : ऋषभ पंतचा ऐतिहासिक पराक्रम; दुखापतीनंतर मैदानात परतत धोनीचा विक्रम मोडला!

Colombo : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या खेळाच्या जोरावर इतिहास रचला