Sunday, February 1, 2026

अलंकार

अलंकार
नुसता बसून राहणारा हा ‘गुळाचा गणपती’ दागिना अंगावर नाही ती ‘लंकेची पार्वती’ हडकुळा मनुष्य जसा ‘काडी पहिलवान’ म्हातारा दिसतोय बघा जसे ‘पिकले पान’ कंटाळवाणे भाषण म्हणजे ‘एरंडाचे गुऱ्हाळ’ रागीट मनुष्याला म्हणे आला ‘आग्यावेताळ’ घराबाहेर न पडणारा झालाय ‘घरकोंबडा’ अतिशय लहान त्याला म्हणे ‘तिळाएवढा’ आटोकाट श्रम करता होई ‘भगीरथ प्रयत्न’ खरपूस मार देण्या दाखवू ‘चौदावे रत्न’ हट्ट धरून बसणारा आहे ‘अडेलतट्टू’ अतिशय चैनीत रमणारा झालाय ‘खुशालचेंडू’ अलंकारिक हे शब्द सारे गोड वाटती कानाला सहज फुलवितात आपल्या मराठमोळ्या भाषेला!
Comments
Add Comment