Sunday, February 1, 2026

Budget 2026 : बजेटपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु; त्या 'टॅब' मध्ये नक्की दडलंय काय?

Budget 2026 : बजेटपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु; त्या 'टॅब' मध्ये नक्की दडलंय काय?

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. थोड्यावेळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या त्या टॅब मध्ये नक्की काय दडलं आहे हे समजेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नव्यांदा देशाचा बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री सितारमण यांना आपल्या हाताने दही - साखर भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. कुढल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दही साखर खाऊन करतो. म्हणूनच दही - साखर भरवून राष्ट्रपती यांनी निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा दिल्या.

अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत जाण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी बजेट सादर करण्यासाठी त्यांनी एक आकर्षक कांजीवरम साडी निवडली आहे. ही साडी तामिळनाडूमधून आली आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ :

अर्थसंकल्पापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी रविवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून एलपीजी ग्राहकांना धक्का दिला आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment