Sunday, February 1, 2026

Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात 'या' तीन कर्तव्यांवर भर

Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात 'या' तीन कर्तव्यांवर भर

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

यावर्षीचा अर्थसंकल्पामधून तीन मुख्य कर्तव्यांवर भर देण्यात आला आहे. तसेच यावर्षीचा बजेट हा युवकांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

बजेटमध्ये भर देण्यात आलेले तीन कर्तव्य :

१. पहिले कर्तव्य - आर्थिक विकासाला वेग देणे आणि स्थायी आर्थिक विकास करणे : आर्थिक विकासाचा वेग वाढवणं आणि तो कायम ठेवणं. यासाठी उत्पादकता आणि स्पर्धा वाढवणं. तसेच जागतिक स्तराच्या सुविधा उपलब्ध करणं.

२. दुसरे कर्तव्य - नागरिकांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे: आपल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि त्यांचं कौशल्य तसेच क्षमता वाढवणं. तसेच भारताच्या प्रगतीत त्यांचा समावेश करून घेणं.

३. तिसरे कर्तव्य - सबका साथ सबका विकास या विकास या धोरणाला अनुकूल निर्णय घेणार: सबका साथ - सबका विकास या तत्वावर आधारित विकास साध्य करणं. यातून प्रत्येक समाज, कुटुंब, प्रदेश यांना साधन-संपत्ती, सुविधा आणि संधी समप्रमाणात उपलब्ध असतील.

Comments
Add Comment