राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही पाटील चालेल, पण पटेल नको

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू असून आज दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असं मत राज ठाकरेंनी मांडलं आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. अशातच सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आल्याने पक्षसंघटनेला त्या कितपत वेळ देऊ शकतील, असा मुद्दा पुढे करत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीर राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही." दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी घडतात, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुढे जाते का, पक्षाला नवं नेतृत्व मिळणार की प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी होणार, हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून