बदलापूर : सकाळची प्रचंड गर्दीची वेळ आणि प्रत्येक जण वेळेवर लोकल पकडून कामावर वेळेवर जाणयासाठी धावपळ करत असतो. पण हीच धावपळ, हीच गर्दी एका नवविवाहितेच्या जीवावर बेतली आहे.
नेमकं घडल काय ?
सकाळची ८ वाजून ११ मिनिटांचीची सीएसएमटी ट्रेन आणि बदलापूर स्टेशनवर जमलेली प्रचंड गर्दी, प्रत्येक जण ट्रेन पकडण्यासाठी घाई करत होतेआणि अश्यातच २८ वर्षीय चेतना चंद्रशेखर देवरुखकर ही तरुणी सुद्धा ट्रेन पकडण्याच्या धावपळीत होती, काही कारणास्तव ट्रेन पकडायला तिला उशीर झाला. अन् ट्रेन स्टेशनवरून सुटली, तीच सुटलेली ट्रेन पकडण्यासाठी चेतना प्रयत्न करत होत्या. याच प्रयत्नात त्यांच्या तोल गेला आणि त्या ट्रेनखाली आल्या यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला.
चेतना देवरुखकर यांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्या बदलापूर जुवेळी येथील जगन्नाथ गॅलेक्सीत वास्तव्याला होत्या. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनानाची बातमी समजताच देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे.
मुंबईत गर्दी वाढत चालल्याने ट्रेनला ही प्रचंड गर्दी असते. अनेकजण ट्रेनला लटकतात जीव धोक्यात घालून धावती लोकल पकडतात. आणि याच धावपळीत याच प्रवासात अनेकजण आपल्या जीवाला मुकतात. अति घाई संकटात नेई, एक ट्रेन चुकली तर चुकूदेत आपल्या आयुष्य लाखमोलाचा असत. याचे भान प्रवाशांनी राखणे गरजेचे आहे.






