रंगणार थरार वर्ल्डकपचा! भारत पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या वर्ल्ड कप कधी? कुठे? पाहता येणार ....

मुंबई : विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की अपेक्षा कमाल स्तरावर पोहोचतात. आता हीच उत्सुकता अंडर-१९ विश्वचषकात पाहायला मिळणार असून, येत्या रविवारी सुपर-६ फेरीत भारतीय आणि पाकिस्तान अंडर-१९ संघ आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेतील आतापर्यंतचा भारतीय संघाचा दबदबा आणि पाकिस्तानविरुद्धची ऐतिहासिक चुरस यामुळे या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.



आतापर्यंत जिंकलेले सामने


भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत विजयी घोडदौड करत आहे. आयुष्य म्हात्रेच्या नेतृत्वाखाली संघाने चार सामने खेळले आहेत.आणि ते चारही सामने जिंकले आहेत, त्यामुळे या हा सामनाही भारताने जिंकावा अशी चाहत्यांची आशा आहे.



IND vs PAK U १९ संघामधील सामना कधी आणि कुठे होईल आणि कुठे पाहता येईल ते जाणून घ्या


सामना कधी खेळला जाईल ?


भारतीय १९ वर्षाखालील संघ आणि पाकिस्तान १९ वर्षाखालील संघ यांच्यातील सामना हा रविवार १ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.



कुठे खेळवला जाईल?


भारत पाकिस्तान मधील विश्वचषकाचा हा सामना झिम्बाब्वेमध्ये बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.



सामना केव्हा सुरु होईल ?


भारतीय अंडर १९ संघ आणि पाकिस्तान अंडर १९ संघ विश्वचषक सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरु होईल . आणि नाणेफेक दुपारी १२:३० वाजता होईल



सामना कुठे पाहता येईल?


हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल शिवाय जीव हॉटस्टार वर मोबाईलद्वारे पाहता येईल.



भारतीय अंडर-१९ संघ:


आयुष्य म्हात्रे (कर्णधार ) , आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, दीपेश देवेंद्रन, मोहम्मद अनन, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन पटेल, हरवंश पंगालिया, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी.


पाकिस्तान अंडर-१९ संघ:


समीर मिन्हास, अली हसन बलोच, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसूफ (कर्णधार), हुजैफा अहसान, हमजा जहूर (यष्टीरक्षक), अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा, मोहम्मद शायन, दानियाल अली खान, उमर झैब, नकब, नक्कल.

Comments
Add Comment

तिरुवनंतपुरममध्ये आज भारत-न्यूझीलंड मालिकेचा समाराेप

होम ग्राऊंडवर संजूसाठी शेवटची संधी? इशानच्या एन्ट्रीने वाढला दबाव तिरुवनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात ‘जनरेशन वॉर’

जोकोविच विरुद्ध अल्काराझ यांच्यात लढत मेलबर्न : मेलबर्न पार्कच्या रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या दोन थरारक

ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेन्काने गाठली अंतिम फेरी

मेलबर्न  :जागतिक क्रमवारीत नंबर १ टेनिसपटू अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

संजू सॅमसनऐवजी इशानला संधी?

टी-२० वर्ल्ड कपमध्ये उतरणारा भारताची तगडी सेना मुंबई  : येत्या ७ फेब्रुवारीपासून मायदेशात सुरू होणाऱ्या टी-२०

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने