मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठी घडामोडी समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर राज्याची आणि पक्षाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता लोकभवनात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपला नवा नेता निवडला असून, सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व आमदारांनी आणि नेत्यांनी सुनेत्रा वहिनींच्या नावावर संमती दर्शवली.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या काही ...
सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे रात्रीच मुंबईत दाखल झाले आहेत. आज होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी अधिकृत निवड केली आहे. अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींकडे पक्षाची सर्व सूत्रे सोपवून कार्यकर्त्यांना आणि आमदारांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. राज्य विधिमंडळाच्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला.






