ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात ‘जनरेशन वॉर’

जोकोविच विरुद्ध अल्काराझ यांच्यात लढत


मेलबर्न : मेलबर्न पार्कच्या रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या दोन थरारक उपांत्य फेरीच्या सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत टेनिस विश्वातील दोन सर्वात मोठे खेळाडू आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकीकडे विक्रमादित्य नोव्हाक जोकोविच आहे, तर दुसरीकडे युवा आणि तडफदार जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला कार्लोस अल्काराझ.


३८ वर्षीय नोव्हाक जोकोविचने (जागतिक क्रमवारीत चौथे स्थान) विद्यमान दुहेरी विजेत्या जानिक सिनरला पाच सेटच्या महाकाव्य लढतीत पराभूत करून ११ व्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये प्रवेश केला. जोकोविचने सिनरवर ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असा विजय मिळवला.


आता अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझशी होईल, ज्याने पहिल्या उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेवला पाच सेटच्या सामन्यात पराभूत केलं होतं. कार्लोस अल्काराझचा सामना सुमारे पाच तास आणि २७ मिनिटे चालला, ज्यामुळे तो स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा सामना ठरला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझचा हा पहिलाच अंतिम सामना असेल. जर हा सामना त्याने जिंकला, तर तो करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनेल. ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळवला जाईल. दिग्गज खेळाडू की नवा तरुण खेळाडू कोण बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा असतील. टेनिस जगत या ऐतिहासिक अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहे, जिथे जोकोविचचा २५ वा ग्रँड स्लॅम आणि अल्काराझचा पहिला ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाचा सामना असणार आहे.


अंतिम सामन्याची पार्श्वभूमी




  • रविवार होणाऱ्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण टेनिस विश्वाचे लक्ष लागले आहे.

  • जोकोविच २४ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर आहे. फायनलमध्ये त्याचा १००% (१०-०) जिंकण्याचा रेकॉर्ड आहे.

  • हा सामना अनुभवी जोकोविच आणि २२ वर्षीय अल्काराझ यांच्यातील 'पिढ्यांची लढाई' म्हणून पाहिला जात आहे.

  • त्यांच्या मागील सामन्यांमध्ये, जोकोविच ५-४ असा अल्काराझच्या पुढे आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही जोकोविचनेच बाजी मारली होती.

Comments
Add Comment

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूला आपलाच संताप पडला महागात; आयसीसीकडून डिमेरिट पॉइंटची शिक्षा

पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा Salman Agha पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर

The Hundred Auction : काव्या मारनच्या 'त्या' कृतीवर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं इंग्लंड येथे होणाऱ्या द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये

आयपीएल २०२६ : हर्षित राणा दुखपातीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. हर्षित राणा आयपीएलमधून बाहेर पडला

सीएसकेविरोधात सन टीव्ही नेटवर्कची मद्रास उच्च न्यायालयात धाव

रजनीकांत यांच्या गाण्यांचा आणि संवादांचा अनधिकृत वापर केल्याचा दावा नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आरसीबीचा 'स्टार' गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर?

जोश हेझलवूड ‘अॅशेस’ मालिकेलाही मुकला होता बंगळूरु : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला २८ मार्चपासून सुरुवात होत