Monday, February 2, 2026

Border 2 Box Office Collection Day 8 : सनी देओलचा जलवा कायम; ८ दिवसांत तब्बल 'इतक्या' कोटींचा टप्पा पार

Border 2 Box Office Collection Day 8 : सनी देओलचा जलवा कायम; ८ दिवसांत तब्बल 'इतक्या' कोटींचा टप्पा पार

मुंबई : सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या विकेंडनंतर चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली तरी, या चित्रपटाने जगभरात ३०० कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. 'सॅकनिल्क' (Sacnilk) या इंडस्ट्री ट्रॅकरनुसार, चित्रपटाने आतापर्यंत भारतात २३५.२५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

पहिल्या आठवड्यातील तुफान प्रतिसादानंतर, ८ व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटाने ११ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी थिएटरमध्ये प्रेक्षकांची एकूण उपस्थिती १५.०५ टक्के इतकी होती. यामध्ये सकाळच्या शोला ६.५८ टक्के, तर रात्रीच्या शोला सर्वाधिक २३.६५ टक्के प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्ये ८५१ शोमध्ये २१ टक्के उपस्थिती नोंदवली गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये १,२७० शोमध्ये १४.६७ टक्के उपस्थिती पाहायला मिळाली. शुक्रवारी राणी मुखर्जीचा 'मदार्नी ३' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.८ कोटींची कमाई केली असली तरी, 'बॉर्डर २' च्या कमाईच्या वेगावर त्याचा कोणताही मोठा परिणाम झालेला दिसत नाही.

अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर २' हा १९९७ मध्ये आलेल्या जेपी दत्ता यांच्या 'बॉर्डर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांज, अहान शेट्टी, मोना सिंग आणि सोनम बाजवा यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ता यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >