फेब्रुवारी १ पासून बदलणार 'या' बँकांचे नियम; जाणून घ्या नवीन नियम

फेब्रुवारी २०२६ हा महिना सरकारी आणि खासगी बँकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. फेब्रुवारीपासून अनेक बँकांचे नियम बदलणार आहेत.  उद्यापासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसी (ICICI) बँक, एचडीफससी (HDFC) बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या ग्राहकांसाठी अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. बँकिंगमधील या मोठ्या बदलांचा थेट परिणाम आता दैनंदिन बँकिंग व्यवहारांवर, क्रेडिट कार्ड वापरावर आणि केवायसीशी संबंधित प्रक्रियांवर होणार आहे.


आयएमपीएस ट्रान्सफर शुल्कापासून ते क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स आणि केवायसी वेळेच्या मर्यादेपर्यंत सर्व नियमांमध्ये बदल होणार आहेत.


एसबीआय बँकेचे नवीन नियम : 


 एसबीआयने काही IMPS व्यवहारांवर आकारले जाणारे सेवा शुल्क बदलले आहे. ₹२५,००० ते ₹ १ लाख दरम्यानच्या ऑनलाइन आयएमपीएस व्यवहारांवर आता ₹२ + जीएसटी आकारला जाईल.  तसेच ₹१  लाख ते ₹२ लाख दरम्यानच्या व्यवहारांवर ₹६  + जीएसटी आकारला जाईल. तर ₹२  लाख ते ₹५ लाखांपर्यंतच्या IMPS व्यवहारांवर ₹१० + GST शुल्क आकारले जाईल.  हे नियम येत्या १५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होतील.


आयसीआयसी बँकेचे नवीन नियम : 


फेब्रुवारी १, २०२६ पासून, ICICI बँक त्यांच्या काही क्रेडिट कार्डवरील बुक माय शो (BookMyShow) मोफत चित्रपट तिकिटाचा लाभ बंद करेल. तर वाहतूक आणि विमा खर्चावर मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स सुरू राहतील. काही कार्ड धारकांसाठी रिवॉर्ड सिस्टम आणखी वाढवली जाईल, म्हणजेच चित्रपटाचा फायदा काढून टाकला जाईल, परंतु इतर रिवॉर्ड्स कायम राहतील.


एचडीफससी बँकेचे नवीन नियम : 


एचडीफससी बँकेने त्यांच्या प्रीमियम इन्फिनिया मेटल क्रेडिट कार्डसाठी रिवॉर्ड पॉइंट रिडेम्पशनमध्ये बदल केले आहेत. १ फेब्रुवारी २०२६ पासून, ग्राहक दरमहा जास्तीत जास्त ५ वेळा रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करू शकतील. पूर्वी, यावर कोणतीही मर्यादा नव्हती.


पंजाब नॅशनल बँक (PNB) चे नवीन नियम : 


पंजाब नॅशनल बँकने त्यांच्या ग्राहकांना त्यांचे KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या खात्यांमध्ये केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. वेळेवर केवायसी अपडेट न केल्यास खात्यातील व्यवहारांवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची