फेब्रुवारी २०२६ हा महिना सरकारी आणि खासगी बँकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. फेब्रुवारीपासून अनेक बँकांचे नियम बदलणार आहेत. उद्यापासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसी (ICICI) बँक, एचडीफससी (HDFC) बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या ग्राहकांसाठी अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. बँकिंगमधील या मोठ्या बदलांचा थेट परिणाम आता दैनंदिन बँकिंग व्यवहारांवर, क्रेडिट कार्ड वापरावर आणि केवायसीशी संबंधित प्रक्रियांवर होणार आहे.
आयएमपीएस ट्रान्सफर शुल्कापासून ते क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स आणि केवायसी वेळेच्या मर्यादेपर्यंत सर्व नियमांमध्ये बदल होणार आहेत.
एसबीआय बँकेचे नवीन नियम :
एसबीआयने काही IMPS व्यवहारांवर आकारले जाणारे सेवा शुल्क बदलले आहे. ₹२५,००० ते ₹ १ लाख दरम्यानच्या ऑनलाइन आयएमपीएस व्यवहारांवर आता ₹२ + जीएसटी आकारला जाईल. तसेच ₹१ लाख ते ₹२ लाख दरम्यानच्या व्यवहारांवर ₹६ + जीएसटी आकारला जाईल. तर ₹२ लाख ते ₹५ लाखांपर्यंतच्या IMPS व्यवहारांवर ₹१० + GST शुल्क आकारले जाईल. हे नियम येत्या १५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होतील.
आयसीआयसी बँकेचे नवीन नियम :
फेब्रुवारी १, २०२६ पासून, ICICI बँक त्यांच्या काही क्रेडिट कार्डवरील बुक माय शो (BookMyShow) मोफत चित्रपट तिकिटाचा लाभ बंद करेल. तर वाहतूक आणि विमा खर्चावर मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स सुरू राहतील. काही कार्ड धारकांसाठी रिवॉर्ड सिस्टम आणखी वाढवली जाईल, म्हणजेच चित्रपटाचा फायदा काढून टाकला जाईल, परंतु इतर रिवॉर्ड्स कायम राहतील.
एचडीफससी बँकेचे नवीन नियम :
एचडीफससी बँकेने त्यांच्या प्रीमियम इन्फिनिया मेटल क्रेडिट कार्डसाठी रिवॉर्ड पॉइंट रिडेम्पशनमध्ये बदल केले आहेत. १ फेब्रुवारी २०२६ पासून, ग्राहक दरमहा जास्तीत जास्त ५ वेळा रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करू शकतील. पूर्वी, यावर कोणतीही मर्यादा नव्हती.
पंजाब नॅशनल बँक (PNB) चे नवीन नियम :
पंजाब नॅशनल बँकने त्यांच्या ग्राहकांना त्यांचे KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या खात्यांमध्ये केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. वेळेवर केवायसी अपडेट न केल्यास खात्यातील व्यवहारांवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.






