बॅालिवुड :बॅालिवुडमधील नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आलिया भट्ट ने एक वक्तव्य केलं त्यावरं चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत.आलिया भट्ट सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असल्याचे आपल्याला पहायला मिळते.आई झाल्यानंतरही तिने आपल्या करिअरमधून ब्रेक घेतलेला नाही. सातत्याने काम करत आलियाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती कायम राखली आहे. मात्र सध्या ती मातृत्व आणि करिअर यामधील समतोल साधताना दिसत आहे.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया भट्टने मातृत्वाबद्दल आणि सोशल मीडियाबाबत मनमोकळं भाष्य केलं. मातृत्वाविषयी बोलताना ती म्हणाली, “हे एक मोठं परिवर्तन आहे, जे नऊ महिन्यांत घडतं. शरीर आणि मानसिकतेत अनेक बदल होतात. पण नऊ महिने पोटात वाढवलेलं बाळ जेव्हा आयुष्यात येतं, तेव्हा सगळंच बदलून जातं. पूर्वीसारखं आयुष्य जगणं जवळजवळ अशक्य होतं.”
सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्याच्या विचारावर आलिया म्हणाली, “अनेकदा असं होतं की सकाळी उठल्यावर सोशल मीडिया डिलीट करावा असं वाटतं. मला फक्त आणि फक्त अभिनय करणारी अभिनेत्री व्हायचं आहे. सततच्या चर्चांमध्ये अडकून राहायचं नाही. पण मला माहित आहे की, सोशल मीडिया डिलीट केल्यास माझा चाहत्यांशी असलेला संपर्क तुटेल. जे सुरुवातीपासून मला पाठिंबा देत आहेत, त्यांच्याशी संवाद कमी होईल. म्हणून इच्छा असूनही मी सोशल मीडिया सोडू शकत नाही.” वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना आलिया म्हणाली की, ती अत्यंत खाजगी आयुष्य जगते. “माझी फोटो गॅलरी आता पूर्णपणे राहाच्या फोटोंनी भरलेली आहे. स्वतःचे फोटो काढण्यासाठीही आता खूप प्रयत्न करावे लागतात,” असंही तिनं सांगितलं.
दरम्यान, आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटात झळकणार असून तिच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.






