मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा उबाठा ठरला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील ०९ विधानसभेत या पक्षाला नगरसेवकांचे खातेच उघडता आलेले नाही. त्यामुळे मुंबईतील ३६ विधानसभेच्या तुलनेत उबाठाला केवळ २७ विधानसभांमध्ये आपले नगरसेवक निवडून आणता आले आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ आणि उबाठाचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेनेचे २९ आणि काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले. मात्र, मुंबईत ८९ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपला मुंबईतील ३६ पैंकी ०५ विधानसभांमध्ये आपले खाते खोलता आलेले नाही. कलिना, वांद्रे पूर्व, धारावी, वरळी आणि शिवडी या पाच विधानसभांमध्ये मागील वेळेसह भाजपला खाते खोलता आले नव्हते. आणि आताही खाते त्यांना खोलता आलेले नाही. या पाचही विधानसभांमध्ये यंदा भाजपने कमळ फुलवण्याचा निर्धार केला होता. परंतु त्यांना यापैंकी एकाही विधानसभेत आपला नगरसेवक निवडून आणत कमळ फुलवता आलेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. तर या पाचही विधानसभांमध्ये उबाठा आणि काँग्रेसचे आमदार असल्याने त्यांना यंदाही नगरसेवक निवडून आणण्याचे स्वप्न साकारता आलेले नाही.
तर महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक उबाठाचे आहेत. मुंबईत उबाठाचे १० नगरसेवक आहेत. परंतु उबाठाला यंदाच्या निवडणुकीत ०९ विधानसभांमध्ये आपला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. अणुशक्ती नगर, मुलुंड, शीव कोळीवाडा, घाटकोपर पूर्व, दहिसर, बोरीवली, चारकोप, मलबारहिल आणि कुलाबा या विधानसभांमध्ये उबाठाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. मुंबईत ठाकरे बंधूंची युती, मराठीचा मुद्दा हाती घेवून उबाठाला या दहाही विधानसभांमध्ये महायुतीने खाते खोलायला दिलेले नाही.
शिवसेनेचे मुंबईत सहा आमदार आहेत. पण या पक्षाचे २९ नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु या पक्षाला संपूर्ण मुंबईतील १४ विधानसभांमध्ये एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. शिवसेना फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असून मुंबईत ठाकरेंच वर्चस्व असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यनेते असलेल्या शिवसेनेला भाजपसोबतच्या युतीमध्ये किती जागा मिळतात आणि कुठल्या विधानसभांमध्ये त्यांचे वर्चस्व राहते याकडे लक्ष होते. परंतु त्यांना मुंबईतील ३६ पैंकी१४ विधानसभांमध्ये खातेही उघडता आलेले नसल्याचे दिसून येत आहे.
कोणत्या विधानसभांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला उघडता आले नाही खाते भाजप : ०५ विधानसभा विधानसभा : कलिना, वांद्रे पूर्व, धारावी, वरळी, शिवडी
उबाठा : ०९ विधानसभा विधानसभा : दहिसर, बोरीवली,चारकोप, मुुलुंड, अणुशक्ती नगर, घाटकोपर पूर्व, मलबार हिल, कुलाबा, शीव कोळीवाडा
शिवसेना : १४ विधानसभा विधानसभा : कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, मुलुंड, भांडुप, घाटकाेपर पश्चिम, कांदिवली, चारकोप, मालाड, माहिम, शिवडी, मलबारहिल, मुंंबादेवी, कुलाबा






