मुंबई : आजपर्यंत विपुल अमृतलाल शाह यांचे अनेक देशभक्तीपर सिनेमे किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालणारे सिनेमे आपण पाहत आलोय. द केरळ स्टोरी हा त्यांच्या कारकिर्दीमधला सर्वात जास्त कमाई केलेला लोकप्रिय चित्रपट ठरला
आता त्याच सिनेमाचा दुसरा भाग आपल्या भेटीला येतोय, तोही अधिक भीतीदायक आणि अनेक कथा उलघडणारा असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि आदिती भाटिया यांनी तीन हिंदू मुलींच्या महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
टिझर विषयी
तीन मुस्लिम मुलांच्या प्रेमात पाडल्यानंतर त्यांचे जीवन कसे भयानक वळण घेते आणि हळूहळू धार्मिक धर्मांतराचा मुद्दा कसा उलघडत जातो हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कस प्रेमाला शस्त्र बनवलं जात, ओळख हिरावून घेतली जाते, स्त्री म्हणून मर्यादा लादल्या जातात, श्रद्धेला संघर्षाचं मैदान कसं बनवलं जात. याचे भयानक आणि गडद वर्णन या टिझर मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे.
केरळ स्टोरी केव्हा प्रदर्शित होणार
केरळ स्टोरी च्या जबरदस्त कथेनंतर देशभरातील प्रेक्षकानं हलवून टाकले. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ' द केरळ स्टोरी २ ची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे, तर आशिष ए.शाह. सनशाईन पिकचर्सच्या सोबत सह निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






