विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रोडक्शन हाऊसकडून येणारा द केरला स्टोरी 2 हा चित्रपट आहे. आँखें, नमस्ते लंडन, सिंह इज़ किंग, फोर्स, कमांडो: ए वन मॅन आर्मी, हॉलिडे: ए सोल्जर इज़ नेवर ऑफ ड्यूटी अशा अनेक प्रभावी चित्रपटांची त्यांची फिल्मोग्राफी आहे. भारतीय सिनेमावर ठसा उमटवणाऱ्या दिग्दर्शकांपैकी ते एक मानले जातात. द केरला स्टोरीच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आपण निर्भीड फिल्ममेकर आहोत, हे सिद्ध केलं होतं आणि हाच बेधडक दृष्टिकोन त्यांच्या संपूर्ण कामात सातत्याने दिसतो.
भीती, राग आणि सत्याने भरलेल्या प्रत्येक फ्रेमसह द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्डचा टीझर पहिल्या भागापेक्षा अधिक तीव्र आणि गंभीर संकेत देतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कमाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात तीन हिंदू मुलींची वेदनादायक कहाणी मांडण्यात आली आहे. या भूमिका उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांनी साकारल्या आहेत. तीन मुस्लिम तरुणांवर प्रेम केल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कसा भयावह वळण मिळतो आणि हळूहळू धार्मिक धर्मांतरणाच्या एका सुनियोजित अजेंड्याचा उलगडा कसा होतो, हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. विश्वास, आपुलकी आणि भावनिक नात्यांपासून सुरू झालेली ही गोष्ट लवकरच फसवणूक, नियंत्रण आणि अडकवून टाकण्याच्या भीषण कथेत बदलते. टीझरमध्ये स्पष्टपणे दिसतं की कसं प्रेमाला शस्त्र बनवलं जातं, ओळख हिरावून घेतली जाते आणि श्रद्धेला संघर्षाचं मैदान बनवलं जातं. संपूर्ण वातावरण तणावपूर्ण आणि अस्वस्थ करणारं असून, प्रत्येक दृश्य भीती आणि दडपलेल्या संतापाने भरलेलं आहे.
हा टीझर या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो की या मुली आता फक्त परिणाम भोगणाऱ्या राहणार नाहीत, तर त्याला उत्तरही देतील. द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड यावेळी केवळ वेदना आणि यातनांची कथा राहात नाही. यावेळी या महिला परिस्थितीच्या मूक बळी ठरत नाहीत. फसवणुकीचे परिणाम गप्प बसून सहन करण्याऐवजी त्या उभ्या राहतात, आवाज उठवतात आणि पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देतात. टीझरसोबत घुमणारा हा नारा चित्रपटाची आत्मा आणि जिद्द स्पष्टपणे व्यक्त करतो—
“आता सहन करणार नाही… लढणार!” पहिल्या द केरला स्टोरीने आपल्या थेट आणि निर्भीड कथेमुळे देशभरातील प्रेक्षकांना हादरवून टाकलं होतं.
त्यानंतर येणारा हा सिक्वेल आणखी पुढे जाण्याचं आश्वासन देतो—कम्फर्टच्या पलीकडे, शांततेच्या पलीकडे आणि नकाराच्या पलीकडे. कमाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्डचे निर्माते विपुल अमृतलाल शाह असून, सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली आशीष ए. शाह हे सह-निर्माते आहेत. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






