Friday, January 30, 2026

डोंट बी शाय’सह प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच लँडमार्क कोलॅबोरेशन जाहीर

डोंट बी शाय’सह प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच लँडमार्क कोलॅबोरेशन जाहीर

प्राइम व्हिडिओ × इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स: रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘डोंट बी शाय’मधून नव्या प्रवासाची सुरुवात

आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांनी आपल्या इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर ग्रिश्मा शाह आणि विकेश भूटानी हे सह-निर्माते आहेत. स्रीती मुखर्जी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी ओरिजिनल चित्रपट ‘डोंट बी शाय’ची घोषणा केली आहे. स्रीती मुखर्जी लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांनी त्यांच्या इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली केली असून, ग्रिश्मा शाह आणि विकेश भूटानी हे सह-निर्माते आहेत.

या चित्रपटाची कथा २० वर्षांच्या श्यामिली उर्फ ‘शाय’ दासभोवती फिरते. शायला वाटते की तिचं आयुष्य पूर्णपणे नियोजनात आहे, पण अचानक आलेलं एक वळण तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतं आणि सगळं तिच्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागतं.

प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स निखिल माधोक म्हणाले की, “आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्यासोबत ही मजेशीर पण तितकीच हृदयाला भिडणारी रोमँटिक कॉमेडी तयार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ‘शाय दास’सारख्या खास व्यक्तिरेखेभोवती फिरणारी ही कथा आहे. भावना, आपलेपणा आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाफ असलेली ही यंग अडल्ट स्टोरी मैत्री, प्रेम आणि मोठं होण्याच्या प्रवासाचं प्रभावी चित्रण करते.” ते पुढे म्हणाले, “मजबूत फीमेल-फॉरवर्ड कथा, फ्रेश, रिलेटेबल आणि मजेशीर लेखन, खरेखुरे व्यक्तिरेखांकन आणि राम संपत यांच्या संगीतमुळे ‘डोंट बी शाय’ जगभरातील प्रेक्षकांसाठी एक सुंदर आणि लक्षात राहणारा अनुभव ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.”

 
View this post on Instagram
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच्या सह-संस्थापक आलिया भट्ट म्हणाल्या, “इटर्नल सनशाइनमध्ये आम्ही नेहमी अश्याच कथा निवडतो ज्या प्रामाणिक वाटतात आणि ज्यांचा स्वतःचा वेगळा आवाज असतो. ही फिल्म आम्हाला लगेच आवडली, कारण तिच्यात साधेपणा आहे आणि कमिंग-ऑफ-एजचा एक सुंदर दृष्टिकोन आहे. स्रीतीची ऊर्जा आणि तिचं पॅशन कथेशी आपोआप जुळून आलं.

हा प्रोजेक्ट माझ्यासाठी आणि इटर्नल सनशाइनसाठी खूप खास आहे. प्राइम व्हिडिओसारखे पार्टनर्स मिळाले, जे निर्भीडपणे क्रिएटिव्ह निर्णय घेतात आणि वेगळ्या प्रकारच्या कथा मनापासून सपोर्ट करतात, त्यामुळे ही कथा सांगण्यासाठी हीच योग्य जागा असल्याचं आम्हाला वाटलं.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >