Friday, January 30, 2026

ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी भाजप–महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी भाजप–महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

ठाणे शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजप–महायुतीच्या भरघोस यशाच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सौ. शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे कृष्णा पाटील यांनी आज ठाणे महापालिका सचिव मनीष जोशी यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे शहर खासदार नरेश म्हस्के, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, माजी आमदार रविंद्र फाटक, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, शिवसेना गटनेते पवन कदम यांच्यासह भाजप व शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा देताना त्यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत मजबूत, स्थिर आणि लोकाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून ठाण्यात पारदर्शक, विकासाभिमुख आणि जबाबदार प्रशासन अधिक सक्षमपणे कार्यरत राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखत महायुतीच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा