अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासंतुलन आणि मंत्रिमंडळातील खात्यांच्या पुनर्वाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावीत, अशी भूमिका मांडली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ आणि नियोजन, खाते तसेच उत्पादन शुल्क विभागाचा कारभार होता. ही सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावीत, असा आग्रह या बैठकीत नेत्यांनी धरल्याची माहिती आहे.

या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बारामती येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत पक्षाची पुढील दिशा, नेतृत्व आणि भविष्यातील राजकीय भूमिका याबाबत चर्चा झाली. त्यानंतर हे सर्व नेते मुंबईत दाखल होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले.


पक्ष नेतृत्त्वाबाबत घडामोडींना वेग


दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाची मागणी पुढे करत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी भूमिका जाहीरपणे मांडली. “सर्वांचीच मागणी आहे की वहिनींना मंत्रिपदी आणावे. ही जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा,” असे झिरवाळ यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यास ती अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू राहील, असेही त्यांनी नमूद केले.


अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य, नेतृत्व कोणाकडे जाणार, तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, यासारख्या अनेक प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्यासारखा सर्वमान्य आणि प्रभावी नेता सध्या पक्षाकडे नसल्याने नेतृत्वाचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत पवार कुटुंबातीलच कुणी पुढे येणार की पक्षातील अन्य वरिष्ठ नेते ही जबाबदारी सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पार्थ आणि जय पवार राजकारणात येणार?

सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार असून त्या राज्याच्या सक्रिय राजकारणात परत येणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याशिवाय अजित पवार यांची मुले पार्थ आणि जय पवार यांना भविष्यात पक्षाची अधिक जबाबदारी दिली जाणार का, यावरही चर्चा सुरू आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष आहे.
Comments
Add Comment

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पूर्व युरोप दौरा, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १९ ते २५ जुलै या कालावधीत मोल्दोव्हा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन

Sir Garfield Sobers : सर गारफिल्ड सोबर्स यांचे ८९ व्या वर्षी निधन

ब्रिजटाउन : क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडूंचे प्रतीक मानले जाणारे सर गारफिल्ड सोबर्स

Supreme Court Verdict : मृतदेह सापडला नाही तरी सिद्ध होणार खुनाचा गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली : एखाद्या खुनाच्या प्रकरणात मृतदेह सापडला नाही, तर आरोपी निर्दोष सुटू शकत नाही, असा अत्यंत महत्त्वाचा

Skyroot Aerospace : भारताचे पहिले खासगी रॉकेट 'विक्रम-१' प्रक्षेपणासाठी सज्ज

नवी दिल्ली : सिंगापूरच्या उच्चायुक्तालयाने शुक्रवारी स्काय-रूट एरोस्पेसच्या ( Skyroot Aerospace) 'विक्रम-१' मोहिमेला

Indian Navy: भारतीय नौदलाच्या ताफ्यात 'सीहॉक' हेलिकॉप्टर

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणखी एक 'एमएच-६०आर सीहॉक' नौदल हेलिकॉप्टर दाखल झाले आहे, अशी माहिती अमेरिकन

Supreme Court : नागरिकत्व ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण

नवी दिल्ली : मतदार यादीत नाव नसल्यामुळे किंवा पुनरीक्षणादरम्यान नाव वगळल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे भारतीय