नवी मुंबई : नवी मुंबई एअरपोर्ट पर्यंतचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उदघाटन हे झाले होते, आणि २५ डिसेंबर पासून व्यावसायिक उड्डाणे सुरु झाली. आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गिकेला मंजुरी दिली आहे.
कशी असेल मार्गिका ?
ही मार्गिका मेट्रो लाईन ८ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार आहे. ज्यामुळे दोन्ही विमानतळ मधील २४ किलोमीटरचा प्रवास सर्वात कमी आणि वेगवान होणार आहे.मेट्रो लाईन ८ मार्गाची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून भूमिगत मार्ग.२५ किलोमीटर आहे. २४.६२६ किमीचा एलिव्हेटेड मार्ग असून २० स्थानके, ६ स्थनाके भूमिगत, १४ स्थानके उन्नत असणार आहे.
गोल्डन लाईन जोडणारी स्थानके
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २, फिनिक्स मॉल एस.जी. बर्वे मार्ग, लोकमान्य टिळक टर्मिनस, गरोडिया नगर, बैगनवाडी, मानखुर्द, ISBT, वाशी, सानपाडा, जुईनगर, एल. पी. जंक्शन. , नेरुळ स्टेशन, सीवूड्स स्टेशन, अपोलो हॉस्पिटल, सागर संगम, तारघर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पश्चिम आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ अशा एकूण २० स्थानकांचा समावेश असणार आहे.
या मार्गिकेला गोल्डन लाईन म्हटलं जातंय कारण या इंटरचेंगमुळे मुंबईतील उत्तर- दक्षिण, पूर्व- पश्चिम मार्ग सहज जोडले जाणार आहेत आणि मध्य मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे






