Friday, January 30, 2026

गृहविभागाच्या अपर मुख्य सचिव पदी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

गृहविभागाच्या अपर मुख्य सचिव पदी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या गृहविभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला असून सनदी अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त आहे.

इक्बाल सिंह चहल यांच्या निवृत्तीनंतर गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनिषा पाटणकर-म्हैसकर या स्वीकारणार आहेत. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदावर कार्यरत असून, त्यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, मनिषा पाटणकर-म्हैसकर यांनी आपला सध्याचा कार्यभार मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सोपवून ३१ जानेवारी रोजी गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment