Friday, January 30, 2026

किया इंडियाने पुन्‍हा लाँच केला किया इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह प्रोग्राम

किया इंडियाने पुन्‍हा लाँच केला किया इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह प्रोग्राम

सुरक्षित व स्‍मार्ट ड्रायव्हिंगला चालना देणार

मुंबई : किया इंडिया या आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकर कंपनीने आज नवीन किया सेल्‍टोससह आपल्‍या किया सेल्‍टोससह इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह (के.आय.डी) प्रोग्रामच्‍या रि-लाँचची घोषणा केली, ज्‍यासह रस्‍ता सुरक्षा, जबाबदार ड्रायव्हिंग वर्तणूक आणि सुधारित ग्राहक सहभागाप्रती ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. के.आय.डी. प्रोग्राम ग्राहकांसाठी कियाच्‍या कनेक्‍टेड उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उपलब्‍ध असेल आणि किया कनेक्‍ट अॅपच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध होऊ शकतो.

किया इन्‍स्‍पायरिंग प्रोग्राम हा ड्रायव्हिंग स्‍कोअर उपक्रम आहे, जो रिअल-टाइम ड्रायव्हिंग वर्तणूकीचे विश्‍लेषण करतो आणि ग्राहकांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग सवयींबाबत कृतीशील माहिती देतो. अचूकता व पारदर्शकतेच्‍या खात्रीसाठी के.आय.डी स्‍कोअरचे वेईकलच्‍या भारित मूल्‍यानुसार गणन केले जाते, जेथे रॅपिड अॅक्‍सेलरेशन, रॅपिड डिक्‍सेलरेशन आणि सडन स्‍टार्ट्स अशा प्रमुख घटकांमध्‍ये सरासरी तीन महिन्‍यांचे रोलिंग घेतले जाते. या पद्धतीमधून खात्री मिळते की, स्‍कोअरमधून तात्‍पुरत्‍या घटनांऐवजी सतत व वास्‍तविक दीर्घकालीन ड्रायव्हिंग पद्धत दिसून येते.

हा उपक्रम रस्‍ता सुरक्षिततेला चालना देतो, तसेच प्रगतीवर देखेरख, मान्‍यता आणि समुदाय-आधारित लीडरबोर्ड्सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांचा सहभाग देखील वाढवतो, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर्सना सुरक्षिततेसंदर्भात अव्‍वल स्‍थान मिळवता येते.

सुरक्षिततेप्रती समुदाय-केंद्रित दृष्टिकोन - वैयक्तिक डेटाव्‍यतिरिक्‍त किया रस्‍ता सुरक्षिततेला एकत्रित जबाबदारपूर्ण कृतीमध्‍ये बदलत आहे. के.आय.डी. प्रोग्राम समुदाय वाढवणारा उपक्रम आहे, जेथे ग्राहक उत्‍साहवर्धक स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेऊ शकतात. किया कारमालक इतर मालकांसह स्‍कोअरची तुलना करू शकतात, समुदायामधील त्‍यांच्‍या स्‍थानावर देखरेख ठेवू शकतात, तसेच त्‍यांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग वर्तणूकीमध्‍ये सुधारणा करत सहकाऱ्यांना मागे टाकण्‍यास प्रेरित केले जाते, ज्‍यासह त्‍यांचा सुरक्षिततेप्रती प्रवास परस्‍पदसंवादात्‍मक व लाभदायी होतो.

या रि-लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या मार्केटिंग अँड सेल्‍सचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले, ''कियाच्‍या तत्त्वामध्‍ये सुरक्षिततेला कायम प्राधान्‍य देण्‍यात येते आणि नवीन सेल्‍टोससह किया इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह प्रोग्राम पुन्‍हा लाँच करत आम्‍ही जबाबदार ड्रायव्हिंग वर्तणूकीला प्रेरित करण्‍याच्‍या दिशेने आणखी एक अर्थपूर्ण पाऊल उचलत आहोत. ग्राहकांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग पद्धतींबाबत स्‍पष्‍ट, डेटा-केंद्रित माहिती देत केआयडी प्रोग्राम त्‍यांना रस्‍त्‍यावर सुरक्षित पर्यायांची निवड करण्‍यास सक्षम करतो, तसेच त्‍यांचा एकूण मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित देखील करतो.''

के.आय.डी. प्रोग्राम रिअल-टाइम ड्रायव्हिंग डेटाच्‍या माध्‍यमातून अंदाजांवर नाही तर वास्‍तविक ड्रायव्हिंग वर्तणूकीच्‍या आधारावर अचूक व पारदर्शक स्‍कोअर्स देतो. यामधील वर्तणूक-आधारित स्‍कोअरिंग सिस्‍टम सुरक्षित व जबाबदार ड्रायव्हिंगला प्रशंसित करण्‍यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्‍यासह कियाचा सुरक्षितता-केंद्रित दृष्टिकोन प्रबळ होत आहे, तसेच ग्राहकांना एकूण रस्‍ता सुरक्षिततेवर त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग सवयींचा होणारा परिणाम उत्तमरित्‍या समजण्‍यास मदत होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >