मुंबई : जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च लिमिटेडने आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत समाप्त झालेल्या तिमाहीसाठी दमदार आर्थिक कामगिरीची नोंद केली, जेथे महसूलामध्ये मोठी वाढ, कार्यसंचालनामधून फायदा आणि खर्चाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन याद्वारे वार्षिक उलाढालीमध्ये उत्तम वाढीची नोंद केली. सप्टेंबर २०२५ मध्ये इनिशिएल पब्लिक ऑफरिंग पूर्ण केल्यानंतर इन्स्टिट्यूटने या तिमाहीत दुसरे सर्वात उत्तम आर्थिक निकाल संपादित केले आहेत.
कार्यसंचालनांमधून महसूल ६,०००.९६ लाख रूपये राहिला, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीमधील ४,३२९.१८ लाख रूपयांच्या तुलनेत वार्षिक ३८.६ टक्के वाढ झाली. इतर उत्पन्न गेल्या वर्षीच्या संबंधित तिमाहीमधील १९.५२ लाख रूपयांच्या तुलनेत १७९.५१ लाख रूपयांपर्यंत पोहोचले. परिणामत: एकूण उत्पन्न वार्षिक ४२.१२ टक्क्यांनी वाढून ६,१८०.४७ लाख रूपयांपर्यंत पोहोचले.
या तिमाहीसाठी एकूण खर्च ५,२४६.९८ लाख रूपये होते, ज्यामध्ये वार्षिक ७.५३ टक्के वाढ झाली. उत्पन्नामध्ये झालेल्या ४२.१२ टक्के वाढीच्या तुलनेत ही वाढ मोठ्या प्रमाणात कमी आहे. कर्मचाऱ्यांसाठी खर्च १,९४६.९२ लाख रूपयांवर स्थिर राहिला, तर वाढलेल्या कार्यसंचालनानुसार इतर खर्चांमध्ये वाढ झाली.
या तिमाहीदरम्यान कार्यसंचालन कामगिरी काहीशा प्रमाणात सुधारली. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीमधील १०२.१८ लाख रूपयांच्या नुकसानाच्या तुलनेत १,२२९.३६ लाख रूपये राहिले. ईबीआयटीडीए गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत -२.३५ टक्क्यांवरून १९.८९ टक्क्यांपर्यंत वाढले, ज्यामधून कार्यसंचालनामधून अधिक फायदा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता दिसून येते.
कंपनीच्या नफ्यामध्ये सर्व स्तरावर मोठी वाढ झाली. करपूर्व नफा (पीबीटी) आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीमधील ५३०.७६ लाख रूपये नुकसानाच्या तुलनेत ९३३.४९ लाख रूपये राहिला. इन्स्टिट्यूटने गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमधील ३८८.८७ लाख रूपये नुकसानाच्या तुलनेत ७०३.०६ लाख रूपये करोत्तर नफ्याची (पीएटी) नोंद केली. पीएटी मार्जिन गेल्या वर्षीच्या -८.९४ टक्क्यांवरून ११.३८ टक्क्यांपर्यंत वाढले.
सप्टेंबरमध्ये जारो आयपीओ म्हणजेच आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत उत्तम वार्षिक कामगिरीमधून कंपनीचा लाभदायी विकास, शिस्तबद्ध खर्च आणि भांडवल कार्यक्षमतेवरील भर दिसून येतो. खर्चांपेक्षा महसूलामध्ये वाढ आणि मार्जिन्समध्ये अर्थपूर्णरित्या विस्तारासह जारो आगामी तिमाहींमध्ये आपली वाढ व नफ्याबाबत गती कायम राखण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहे.






